पीसीएमसी स्मार्ट सारथी
पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशन आणि वेब पोर्टल आहे. महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग असावा यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने पीसीएमसी स्मार्ट सारथी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिक आणि महानगरपालिका यांच्यातील नाते दृढ करणारा हा प्रकल्प आहे. आजच्या तंत्रस्नेही युगामध्ये माहितीच्या आदान प्रदानातून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हाच या प्रकल्पामागचा मुख्य हेतू आहे.
पीसीएमसी स्मार्ट सारथी हे नागरिकांना महानगरपालिकेशी जोडून त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी उचलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सर्व सेवा, सुविधा मोबाईल अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळ यांच्या माध्यमातून आगामी काळात उपलब्ध करून देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या सुविधा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यु ट्यूब या आणि अशा अनेकविध समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात येणार आहे.
पीसीएमसी स्मार्ट सारथीमध्ये नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.
१) तक्रार निवारण सुविधा.
२) कर भरणा सुविधा.
३) पाणीपट्टी देयक भरण्याची सुविधा.
४) विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म आणि मृत्यूचा दाखला इत्यादी मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा.
५) वाहतुकीशी संबंधित ताजी माहिती.
६) महानगरपालिका कर्मचारी, रुग्णालय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस इत्यादींचे संपर्क क्रमांक.
७) आवश्यकता असेल तिथे नागरिकांना एसएमएस, ई-मेल आणि नोटीफिकेशन्स पाठवण्याची सुविधा.
८) पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या कार्यक्रमांची माहिती आणि ताज्या बातम्या.
९) लेखकांच्या साहय्याने लेख आणि ब्लॉग प्रकाशित करण्याची सुविधा.
१०) विविध विषयांवर मतचाचण्यांचे आयोजन.
पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून नागरिक आणि महानगरपालिका परस्परांच्या अधिक जवळ येत आहेत. नागरिकांना महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांचा सुलभतेने उपयोग करता येईल. महानगरपालिकेला नागरिकांच्या नेमक्या गरजा काय आहेत याची अधिकाधिक माहिती मिळेल. एकूणच या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना मिळेल. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे नव्या, डिजिटल पिंपरी-चिंचवडचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने घेऊन जाणारे महत्त्वाचे साधन आहे.
चला तर मग, पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप्लिकेशनवर रजिस्ट्रेशन करून आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सहयोग करू या.